मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल, तब्बल १३ उपायुक्तांच्या बदल्या
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस दलातील तब्बल १३ उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात खांदे पलट करण्यात आली आहे. या बदल्यांनुसार, कृष्णकांत उपाध्याय यांची परिमंडळ ३, तर दत्ता किसन नलावडे यांची परिमंडळ १० मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. महेश धर्माजी चिमटे यांची परिमंडळ १२, आणि समीर अस्लम शेख यांची परिमंडळ ६ मध्ये नियुक्ती झाली आहे. तसेच राकेश ओला यांच्याकडे परिमंडळ ७ ची जबाबदारी देण्यात आली आहे.
नवनाथ ढवळे यांची अंमली पदार्थ विरोधी पथक, विजयकांत मंगेश सागर यांची बंदर परिमंडळ, आणि प्रशांत अशोकसिंग परदेशी यांची वाहतूक विभाग (दक्षिण) मध्ये बदली झाली आहे. निमित गोयल यांची विशेष कृती दल (आ.गु.वि) मध्ये तर दत्तात्रय कांबळे यांची विशेष शाखा १ मध्ये नियुक्ती झाली आहे. पुरुषोत्तम नारायण कऱ्हाड यांच्याकडे सायबर आणि गुन्हे विभाग, सचिन बी. गुंजाळ यांच्याकडे प्रतिबंधक गुन्हे शाखा, आणि राज तिलक रोशन यांच्याकडे गुन्हे प्रकटीकरण विभाग देण्यात आला आहे. या फेरबदलांमुळे मुंबई पोलीस दलातील विविध विभागांना नव्या अधिकाऱ्यांचे नेतृत्व मिळणार आहे. गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था, अंमली पदार्थांवरील कारवाई, आणि सायबर गुन्हे यासारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये अनुभवी अधिकाऱ्यांची नेमणूक केल्याने, आगामी काळात शहराची सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
१) कृष्णकांत उपाध्याय यांची परिमंडळ ३ पदी नियुक्ती,२) दत्ता किसन नलावडे यांची परिमंडळ १० पदी नियुक्ती, ३ )महेश धर्माजी चिमटे यांची परिमंडळ १२ पदी नियुक्ती, ४) नवनाथ ढवळे यांची अंमली पदार्थ विरोधी पथक पदी नियुक्ती, ५) विजयकांत मंगेश सागर यांची बंदर परिमंडळ पदी नियुक्ती, ६) प्रशांत अशोकसिंग परदेशी यांची वाहतूक (दक्षिण) पदी नियुक्ती, ७) निमित गोयल यांची विशेष कृती दल (आ.गु.वि) पदी नियुक्ती, ८) दत्तात्रय कांबळे यांची विशेष शाखा १ पदी नियुक्ती, ९) पुरषोत्तम नारायण कऱ्हाड यांची सायबर, गुन्हे पदी नियुक्ती, १०) सचिन बी. गुंजाळ यांची प्रतिबंधक (गुन्हे) शाखा पदी नियुक्ती, ११) समीर अस्लम शेख यांची परिमंडळ ६ पदी नियुक्ती, १२) राकेश ओला यांची परिमंडळ ७ पदी नियुक्ती आणि १३) राज तिलक रोशन यांची गुन्हे प्रकटीकरण पदी नियुक्ती.