कल्याण रेल्वे स्थानकात महिलांच्या डब्यात दादागिरी; तरुणीला मारहाण करून लोकलमधून खाली ढकलले

Spread the love

कल्याण रेल्वे स्थानकात महिलांच्या डब्यात दादागिरी; तरुणीला मारहाण करून लोकलमधून खाली ढकलले

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण रेल्वे स्थानक येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कल्याणहून बदलापूर कडे जाणाऱ्या लोकलमधील महिलांच्या डब्यात एका तरुणीवर अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

लोकल कल्याण स्थानकातून सुटल्यानंतर अचानक झालेल्या गोंधळात संबंधित तरुणी गाडीत पडली. याचवेळी डब्यातील तीन ते चार महिला प्रवाशांनी तिच्यावर दादागिरी करत मारहाण केली. तरुणीचे डोक्याचे केस ओढत तिला लोकलमधून खाली उतरवण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ काही प्रवाशांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून, तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या घटनेची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon