बनावट नोटा छापणाऱ्या टोळीवर मालवणी पोलिसांचा छापा; दोन आरोपी अटकेत, सुमारे २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

बनावट नोटा छापणाऱ्या टोळीवर मालवणी पोलिसांचा छापा; दोन आरोपी अटकेत, सुमारे २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई – मालवणी पोलीस ठाण्याच्या निगराणी पथकाने बनावट नोटा तयार करणाऱ्या दोन इसमांना रंगेहात पकडले. २९ मे २०२५ रोजी सायंकाळी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून साईबाबा मंदिराजवळ मार्वे बिच रोडवर निळ्या रंगाची बलोनो कार संशयास्पद अवस्थेत उभी असल्याचे आढळून आले. कारमध्ये दोन इसम बसलेले असून त्यांच्याकडे बनावट नोटा असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. पोलिसांनी पंचांसह छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आणि कारची झडती घेतली असता, कारमधून ५०० रुपयांच्या एकूण १७४० बनावट नोटा, नोटा छापण्यासाठी वापरले जाणारे लॅपटॉप, प्रिंटर, इंक, पेपर, कटर, कैची, स्केल, टेप अशा वस्तू सापडल्या. आरोपींच्या मोबाईल फोनसह कार देखील जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे २३,३०,००० रुपये इतकी आहे.

या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये संपत सामवय्या एंजपल्ली, वय ४६, रा. गांधी नगर, जिल्हा जयशंकर (भुपालंपली), तेलंगणा व रहीमपाशा याकुब शेख, वय ३०, रा. घनपूर, जिल्हा वारंगल, तेलंगणा यांचा समावेश आहे. सदर कारवाई शशीकुमार मिना (अपर पोलीस आयुक्त, उत्तर विभाग, मुंबई),आनंद भोईटे (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ११), निता पाडवी (सहाय्यक पोलीस आयुक्त, मालवणी विभाग), मा. शैलेंद्र नगरकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस ठाणे) आणि मा. जिवन भातकुले (पोलीस निरीक्षक, गुन्हे विभाग, मालवणी पोलीस ठाणे) यांच्या सूचनांनुसार आणि मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत तपास अधिकारी म्हणून डॉ. दीपक हिंडे (पोलीस उपनिरीक्षक) आणि त्यांच्या निगराणी पथकातील पोलीस अंमलदार अनिल पाटील, जगदीश घोसाळकर, संशात पाटील, सचिन वळतकर, मुद्दसिर देसाई, समित सोरटे आणि कालीदास खुडे यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon