खुनाचा छडा ४ तासात उघड; पत्नी व प्रियकराकडून पतीचा खून उघड
मुंबई – अँटॉप हिल परिसरात २६ मे २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास घडलेला एक गंभीर खुनाचा प्रकार फक्त ४ तासांत उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. मयत ईस्माईल अली शेख (वय ३७) याचा त्याची पत्नी सुमय्या ईस्माईल अली शेख (वय २६) आणि तिचा प्रियकर सकलाईन गोलम किब्रिया शेख (वय २७) यांनी मिळून चाकूने गळा चिरून निर्घृण खून केला. हा प्रकार राजीव गांधी नगर झोपडपट्टी, अँटॉप हिल येथे घडला. फिर्यादी निजाम अख्तर शेख (वय ३८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अँटॉप हिल पोलीस ठाण्यात गु.र.क्र. २२१/२०२५, कलम ३०२ भादंवि अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी सुमय्या हिला तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने तिच्या अनैतिक संबंधांची कबुली देत पतीच्या खुनात प्रियकर सकलाईनचा सहभाग असल्याचे सांगितले. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी सकलाईनचा मिरा दातार दर्गा परिसरातील ठावठिकाणा शोधून काढला. पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले. चौकशीत दोघांनी मिळून खुनाचा कट रचून ईस्माईल याचा गळा चाकूने कापून खून केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी दोघांना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. ही उल्लेखनीय कामगिरी खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी अप्पर पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग) विक्रम देशमाने, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ५) गणेश गावडे, सहायक पोलीस आयुक्त (सायन विभाग) शैलेंद्र शिवार, या कारवाईत प्र.व. पो.नि. अर्चना पाटील, पो.नि. समीर कांबळे, स.पो.नि. सतीश कांबळे, स.पो.नि. शिवाजी मदने, स.पो.नि. प्रदीप पाटील, स.पो.नि. अण्णासाहेब कदम, पो.उ.नि. शैलेश शिंदे, पो.उ.नि. निलेश राजपूत, पो.उ.नि. सरोजिनी इंगळे यांचा मोलाचा सहभाग होता. तसेच पो.ह.क. घुगे, टेळे, गस्ते, पो.शि.क. पाटील, पाथरूट, विसपुते, माने, गाडगे, सजगणे, म.पो.शि. त्रिपुटे, जाधव व पो.ह. ठोके यांनी देखील आपल्या कर्तव्यनिष्ठेने आणि सतर्कतेने ही कारवाई यशस्वी केली. या यशस्वी तपासामुळे गुन्ह्याचा वेळीच छडा लागून आरोपींच्या अटकेमुळे समाजात कायद्याचा धाक निर्माण झाला असून, संपूर्ण तपासी पथकाचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.