अभिनेते आदित्य रॉय कपूरच्या घरात दुबईच्या अज्ञात महिलेची घुसखोरी; पोलीसांनी महिलेला घेतले ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – काही महिन्यांपूर्वी अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता. यानंतर आता काहीच दिवसांपूर्वी मोठी सुरक्षा असतानाही सलमानच्या घरात एक अज्ञात महिलेनं प्रवेश केला होता. आता आणखी एका अभिनेत्याच्या घरात अशीच घटना घडली आहे. अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्या राहत्या घरी एका अज्ञात महिलनं घुसखोरी केली केल्याचा प्रकार समोर. आदित्य राय कपूर याच्या बांद्र्यातल्या रिजवी कॉम्प्लेक्स इथल्या घरात एका महिलेनं घुसखोरी केली. एक महिला बळजबरीनं आदित्यच्या घरात शिरली. आदित्यच्या घरात काम करणाऱ्या एका महिलेनं या अज्ञात महिलेला पाहिलं आणि तत्काळ पोलिसांना याबद्दल कळवलं. पोलिसांनी देखील दखल घेत या महिलेविरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिस या सगळ्याचा तपास करत आहेत.
या महिलेचं नाव गजाला जकारिया सिद्दीकी असल्याचं म्हटलं जात आहे. या महिलेचं वय ४७ असल्याचं समोर आलंय. धक्कादायक गोष्ट म्हणजे ही महिला दुबईची रहिवासी असल्याचं समोर आलं आहे.