उल्हासनगरमध्ये नृत्य शिक्षिकाचा कारनामा; तीन वर्षांच्या अल्पवयीन मुलावर अत्याचार

Spread the love

उल्हासनगरमध्ये नृत्य शिक्षिकाचा कारनामा; तीन वर्षांच्या अल्पवयीन मुलावर अत्याचार

पोलीस महानगर नेटवर्क

उल्हासनगर – मार्च, एप्रिल महिन्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या की अनेक ठिकाणी उन्हाळी शिबिराचे आयोजन केले जाते. असच एक नृत्य शिबिर उल्हासनगरमध्ये भरवण्यात आले होते. दरम्यान डान्स क्लास चालविणाऱ्या टीचरने एका तीन वर्षांच्या अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून डान्स शिक्षकाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली.

उल्हासनगर पूर्वेत उन्हाळी सुट्टीत डान्स क्लास चालविणाऱ्या दुलानी नावाच्या शिक्षकाकडे पालक मोठ्या विश्वासाने मुलांना नृत्य शिकवण्यासाठी पाठवत होते. दोन दिवसापूर्वी डान्स शिबिरात विश्रांती घेत असलेल्या एका तीन वर्षांच्या मुलाला दुलांनी नावाच्या टीचरने शेजारील अंधारी खोलीत नेऊन कपडे काढण्यास सांगितले. त्यानंतर मुलावर अत्याचार केला. मुलाला त्रास झाल्यावर त्याने झालेल्या प्रकाराची माहिती आई-वडीलांना दिली. त्यांना झालेल्या घटनेने धक्का बसून त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य बघून दुलांनी नावाच्या डान्स टीचरवर गुन्हा दाखल करून अटक केली.

विठ्ठलवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री दुलांनी टीचरच्या घरी धाड टाकून अटक केली. दुलानीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. असाच प्रकार डान्स क्लास मधील इतर मुलावर झाला का? याबाबत पोलीस डान्स क्लास मधील मुलांना विश्वासात घेऊन चौकशी करीत आहेत. असी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon