बोरीवलीत पब्लिक ब्रीजला मोठी आग, सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – बोरीवली पाश्चिमेत स्टेशन बाहेर पब्लिक ब्रीजला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बोरिवली पश्चिम स्टेशनबाहेर स्काय वॉकमध्ये ही मोठी आग लागली.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा २ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु केले.
स्काय वॉकमधून आग खाली पडत असल्यामुळं पोलिसांनी वाहतुकीसाठी पब्लिक ब्रीज बंद केला. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. आग नेमकी कशामुळे लागली, या संदर्भात अधिक तपास बोरिवली पोलीस आणि अग्निशमाक दलाचे जवान करत आहेत.हजारो चाकरमानी बोरवलीमधून मुंबईत नोकरीसाठी येतात. या नोकरदारांसाठी संध्याकाळची वेळ फार महत्त्वाची असते. कारण ते संध्याकाळच्या वेळी आपल्या घरी जाण्यासाठी निघतात. काही जण अपवाद वगळले तर जवळपास सर्वजण लोकल ट्रेनच्या माध्यमातूनच घरी जातात. त्यामुळे हा सर्व नोकरदार वर्ग लोकल ट्रेन सेवेवर विसंबून असतो, संध्याकाळी घराच्या दिशेने जाणाऱ्यांची गर्दी असते, मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या वेळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली. आगीचा रेल्वेसेवेवर कुठलाही परिणाम झाला नाही.