पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा मेसेज; रुग्णालयातील सुरक्षा गार्डच निघाला आरोपी

Spread the love

पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा मेसेज; रुग्णालयातील सुरक्षा गार्डच निघाला आरोपी

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – शहरातील ससून हॉस्पिटल मधील एका डॉक्टरच्या मोबाईल फोनवर एका फोन नंबरवरून अज्ञात इसमाने ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब या आशयाचा मेसेज केल्याने खळबळ उडाली होती. १२ मे रोजी आलेल्या या मेसेजनंतर बंडगार्डन पोलीस, बीडीडीएस यांनी हॉस्पिटल पिंजून काढले. मात्र, काहीही आढळून आले नाही. पण, आरोपीच्या या मेसेजमुळे हॉस्पिटल परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हॉस्पिटल प्रशासन आणि पोलीसही तणावात होते. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा तपास केला. अखेर आरोपीला अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. ससून हॉस्पिलट बॉम्ब अफवा पसरवल्याप्रकरणी आरोपी अरविंद कृष्णा कोकणी (२९) याला येरवडा परिसरातून बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी, त्याच्याकडे चौकशी केली असता तो ससून हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून नेमणुकीस असून गुन्हा केला त्यावेळी वापरलेला मोबाईल हा ससून हॉस्पिटलमधील एका महिला पेशंटचा चोरला असल्याचे तपासात निष्पण्ण झाले. महिला पेशंटच्या याच मोबाईल फोनवरुन ससूनमधील एका डॉक्टरांच्या मोबाईलवर ससूनमध्ये बॉम्ब असल्याचा मेसेज आरोपीने केला. त्यानंतर, त्याने मोबाईल नंबर स्विच ऑफ केला होता. दुसऱ्या दिवशी परत मोबाईल ऑन करून ससून हॉस्पीटलचे वैद्यकीय अधीक्षक यांना देखील धमकीचा मेसेज करून मोबाईल पुन्हा ऑफ करून ठेवण्यात आला. मात्र, बंडगार्डन पोलिसांनी खबऱ्यामार्फत तपास करत आरोपीला अटक केली. दरम्यान, आरोपीने अशा प्रकारचा मेसेज का केला, याचा तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon