चेंबूर परिसरात अमली पदार्थ जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकानी केली कारवाई
६ कोटी १९ लाख ४८ हजार रूपये किमतीचा अमली पदार्थ जप्त
रवि निषाद/मुंबई
मुंबई – चेंबूर येथील अमली पदार्थ विरोधी पथकानी एका गुप्त सूचनावर्ती काम करत एका इसमाचा घरी छापेमारी करुन ६ कोटी १९ लाख ४८ हजार रूपयेचा अमली पदार्थ जब्त केलाचा माहिती मिळाली आहे.ज्या एमडी(मेफेड्रान),कोडेन फास्फेट युक्त आणि गांजाचा समावेश आहे. परिमंडळ ६ अमली पदार्थ विरोधी पथक प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक मैत्रानंद खंदारे याना एका गुप्त बातमीदारानी १३/०५/२०२५रोजी सांगितले की, गोवंडी शिवाजी नगर कमलारमन नगर मध्ये राहणाऱ्या सलमान शेख आणि त्याचे साथीदार मोठा प्रमाणत एमडी, गांजा आणि कोडेन फास्फेटचा बोतल ब्यवसाय करण्यासाठी ठेवळे आहे.आणि दिवसा दिवस ते लोक विक्री करतात.सदर प्राप्त माहितीचा अनुषंगाने सहायक पोलिस निरीक्षक श्री खंदारे आणि त्यांचा टीमनी सलमान शेखचा घरी छापामारी केली.या मध्ये शिवाजी नगर पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक पवार,सहायक पोलिस निरीक्षक खेबुडे आणि पथकचा समावेश होता.या छापामारी मधे पोलिसांनी ३ किलो ७८ ग्राम एमडी,१२ किलो गांजा आणि ३६ बोतल कोडेन फॉस्फेट आणि १ लाख ३० हजार नगद मंझे एकूण ६ कोटी १९ लाख ४८ हजार रूपयेचा अमली पदार्थ जब्त केला.ताब्यात घेतलेला इसम नाव सलमान इजहार शेख २३ वर्ष सांगण्यात येत आहे.ज्याचा विरोधात शिवाजी नगर पोलिस ठाणे मधे गुन्हे क्र.३३५/२०२५ कलम ०८(क) सह कलम २२(क),२०(ब),२९ एन डीपीएस कायदा १९८५ अन्वय गुन्हे नोंद करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण कारवाई परिमंडळ ६ चे दक्ष पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांचा मार्गदर्शनाखाली केला गेला आहे.ज्याची कौतुक संपूर्ण परिसरचा नागरिक करत आहेत.