जळगावच्या सम्राट कॉलनीत चार ते पाच घरांवर २० ते २५ तरुणांच्या टोळक्याकडून सशस्त्र हल्ला; दुचाकी आणि चार चाकी वाहनांची तोडफोड

Spread the love

जळगावच्या सम्राट कॉलनीत चार ते पाच घरांवर २० ते २५ तरुणांच्या टोळक्याकडून सशस्त्र हल्ला; दुचाकी आणि चार चाकी वाहनांची तोडफोड

योगेश पांडे / वार्ताहर

जळगाव – जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जळगावच्या तुकारामवाडी परिसरातील सम्राट कॉलनीत चार ते पाच घरांवर तरुणांच्या टोळक्याकडून सशस्त्र हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. या तरुणांच्या टोळक्याकडून दगडफेक देखील करण्यात आली आहे. तसेच तलवारी व इतर शस्त्रांनी हल्ला करत घराबाहेर पार्क करण्यात आलेल्या दुचाकी आणि चारचाकींची देखील तोडफोड करण्यात आली आहे, या घटनेमध्ये मोठं नुकसान झालं आहे. जळगावच्या तुकारामवाडी परिसरात असलेल्या सम्राट कॉलनीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. २० ते २५ तरुण हातामध्ये तलवारी, कोयते आणि बंदुका घेऊन कॉलनीमध्ये शिरले त्यांनी दगडफेक केली तसेच आपल्या हातातील शस्त्रांनी कॉलनीमध्ये पार्क केलेल्या वाहनांंवर हल्ला केला, या घटनेत वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे, अशी माहिती स्थानिकांकडून देण्यात आली.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार २० ते २५ तरुणांचं टोळकं होतं. त्यांच्या हातात शस्त्रं होती. त्यांनी दगडफेक करत वाहनांवर हल्ला केला. कॉलनीमधील रहिवाशांनी दरवाजा न उघडल्यानं तसेच ते यादरम्यान घराबाहेर न पडल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेत नागरिक सुरक्षित असून कोणालाही दुखापत झालेली नाहीये. मिळालेल्या माहितीप्रमाणे तब्बल एक तास या तरुणांच्या टोळक्यानं या परिसरात राडा केला. कॉलनीमध्ये पार्क करण्यात आलेल्या दुचाकी आणि चार चाकी वाहनांवर हल्ला करण्यात आला या घटनेत वाहनांचंं मोठं नुकसान झालं आहे. तरुणांच्या दोन गटामध्ये असलेल्या पूर्व वैमनस्यातून ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर या परिसरामध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कॉलनीमध्ये घुसून राडा करणाऱ्या तरुणांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon