गोवंडी येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
रवि निषाद / मुंबई
मुंबई – गोवंडी शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी १ लाख रूपये लाच स्वीकारतांना अटक केलाची माहिती मिळाली आहे. अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव बाबुराव मधुकर देशमुख (५७) असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळाली माहितीनुसार, तक्रारदार याच्याकडून बाबुराव देशमुख यांनी ३ लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार हे एका ट्रस्टचे ट्रस्टी असून सदर ट्रस्टच्या शाळेच्या परिसरात दिनांक १५/०८/२०२४ रोजी काही इसमांनी उपरोक्त शाळेच्या गेटचे कुलूप तोडून जबरदस्तीने प्रवेश केला होता. सदरबाबत तक्रारदार यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे तसेच धर्मादाय आयुक्त बृहन्मुंबई विभाग यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता.त्या अनुषंगाने तक्रारदार यांना मदत करण्यासाठी तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालय, वरळी,मुंबई यांचा अंतिम आदेश येईपर्यंत सदर ट्रस्टच्या परिसरात विरोधकांना प्रवेश करू न देण्यासाठी तसेच पोलीस संरक्षण देण्यासाठी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे रु. ३,००,०००/- लाचेची मागणी केली व तडजोडी अंती रक्कम रु.२,५०,०००/- स्वीकारण्याचे लोकसेवक यांनी मान्य केला होता.त्या नंतर तक्रारदार यानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार केली होती आणि दिनांक १३/०५/२०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये निष्पन्न झाल्याने लागलीच करण्यात आलेल्या सापळा कारवाईमध्ये लोकसेवक यांनी लाचेचा पहिला हप्ता रक्कम रु.१,००,०००/- स्वीकारताना लोकसेवक यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.