मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करणाऱ्या आरोपीला पुण्यातून बेड्या

Spread the love

मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करणाऱ्या आरोपीला पुण्यातून बेड्या

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे – भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज पाठवून आणि कॉल करुन त्रास देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अमोल काळे असं आरोपीचं नाव असून तो पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. सदर आरोपी हा गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडेंना कॉल आणि मेसेजद्वारे त्रास देत होता. या प्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी बीएनएसच्या कलम ७८ आणि ७९ तसेच आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. सायबर पोलिसांनी भोसरी पोलिसांच्या मदतीने आरोपी अमोल काळेला बेड्या ठोकल्या आहेत.

अमोल काळे (२५) पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करुन त्रास देत होता. याप्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून जवळच्या सायबर पोलीस स्थानकांत संपर्क करुन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि फोन करणाऱ्याचे ठिकाण शोधले आणि तो पुण्यातील भोसरीत असल्याचे आढळून आले. यानंतर, सायबर पोलिसांनी भोसरी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या मदतीने आरोपी अमोल काळे याला अटक केली. चौकशीत काळेने पंकजा मुंडे यांना फोन केल्याची कबुली दिली. अमोल काळेला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. एका सायबर अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी हा विद्यार्थी आहे आणि त्याने अपशब्द वापरण्यामागील आणि त्रासदायक वर्तनामागील हेतू सध्या तपासला जात आहे. मात्र, त्याला पुण्यातील भोसरी येथून अटक करण्यात आली असली तरी आरोपी अमोल काळे हा बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon