भेसळयुक्त दारू विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, बी विभाग ठाणे यांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या
निरीक्षक जे.एम. खिल्लारे यांच्या पथकाकडून छापेमारी, ५ आरोपीं अटकेट तर मुख्य सूत्रधार फरार
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – दारू हा सर्वांचा आवडता विषय व अनेकांना धुंदी आणणारं पेय. मात्र काही महाभाग ग्राहकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करून स्वताचा व्यवसाय करतात. अशीच एक घटना कोनगाव परिसरात घडली आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त अंमलबजावणी व दक्षता प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क ठाणे, प्रदीप पवार, ठाणे अधीक्षक प्रविण तांबे, उपअधीक्षक, व्ही. व्ही. वैद्य व देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली खात्रीलायक गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल पी एम पॅलेसच्या बाजुला गल्लीमध्ये, पेणकरपाडा मिरारोड पूर्व, ता.जि.ठाणे या ठिकाणी बेकायदेशीररित्या भारतीय बनावटीचा विदेशी मद्याचा साठा करुन विक्री केली जाते अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरुन सदर ठिकाणी छापा टाकला असता आरोपी रामकेश सिताराम गुप्ता त्यांच्या ताब्यातील १२५४७०/-रुपये किमंतीचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला. त्यांच्याकडील मिळालेल्या मुद्येमालाबाबत चौकशी केली असता त्याने भारतीय बनावटीचा विदेशी मद्याचा साठा एक इसम मला हप्त्यातुन एक वेळा पुरवठा करतो त्याबाबत अधिक चौकशी केली असता तो मद्य साठा पुरवणार आहे असे चौकशी कामी सांगितले तसेच हॉटेल एम पॅलेसच्या बाजुला सर्व स्टाफसह सापळा रचून दबा धरुन बसलो असता आरोपी रामकेश सिताराम गुप्ता यांनी सांगितले की, मद्य पुरवठा करणारा इसम हा चेतन वाईन शॉप समोर, जांगीर सर्कल, सृष्टी रोड, मिरारोड पूर्व, ता.जि.ठाणे. येथे मद्याचा साठा पुरवणार असल्याचे सांगितल्याप्रमाणे आरोपी रामकेश सिताराम गुप्ता सह चेतन वाईन शॉप समोर, जांगीर सर्कल, सृष्टी रोड, मिरारोड पूर्व ता.जि.ठाणे येथे थांबलो असता काही वेळात टेम्पो क्र.एमएच-१२-एचडी-७७६१ आला असता टेम्पो मधील इसमानी आरोपी क्र.१) रामकेश सिताराम गुप्ता यांस १८० मिली क्षमतेचा रॉयल चॅलेज व्हिस्कीचा बॉक्स व १८० मिली क्षमतेचा डिएसपी ब्लॅक बॉक्स डिलीव्हरी दिली. सदरच्या वेळी वाहन व ड्रायव्हर तसेच मद्याच्या डिलेव्हरी देणा-या इसमास ताब्यात घेवून तपास केला असता सदर १८० मिली क्षमतेचा रॉयल चॅलेज व्हिस्कीचा बॉक्स व १८० मिली क्षमतेचा डिएसपी ब्लॅक बॉक्स असे दोन वॉक्स विनावाहतुक पासाचे मिळुन आल्याने वाहन, त्याचा ड्रायव्हर व मद्याची डिलेव्हरी देणा-या इसमाची सखोल चौकशी केली असता त्यांनी चौकशीत सांगितले की, डिलीव्हरी केलेले दोन बॉक्स आम्हाला आमचे मालक राकेश बाळाराम म्हात्रे रा. बाळाराम म्हात्रे विठाबाई निवास, जांभूळवाडी, कल्याण भिवंडी रोड कोनगाव ता. भिवंडी जि.ठाणे. यांनी त्याच्या राहत्या घरातुन दिलेले असल्याचे सांगितले.
त्यानुसार सर्व स्टाफसह त्याच्या राहत्या घरी दारुबंदी गुन्हयाच्या कामी गेलो असता कसून चौकशी केली असता तेथे नितेश वाळाराम म्हात्रे वाहन क्र. एमएच-०४-इएल-७८०२ मध्ये भारतीय बनावटीचा विदेशी मद्याचा साठा भरत असल्याचा दिसून आल्याने त्यास ताब्यात घेवून चौकशी केली असता सदरचा माल हा घराच्या मागे असलेल्या खोली मध्ये रिकाम्या बाटल्यामध्ये भरुन मशिनच्या सच्या साहयाने बनावट बुचे बसवून सिल बंद केले जाते. दारुबंदी गुन्हयाकामी सदर घराची झडती घेतली असता बनावट बुचे व भारतीय बनावटीचा विदेशी मद्याच्या बाटल्या सिलबंद करण्यासाठी लागणारी मशिन विविध ब्रेन्ड व इतर साहित्य असा एकुण अंदाजे किंमत रु. ६१,४६,५५०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी रामकेश सिताराम गुप्ता, राहूल ज्ञानेश्वर काटे, गणेश प्रकाश बांद्रे, पप्पू देवनाथ गुप्ता व नितेश बाळाराम म्हात्रे यांस अटक केलेली आहे. गुन्हयातील मुख्य सुत्रधार ६ वा आरोपी राकेश बाळाराम म्हात्रे मिळुन न आल्याने त्याला फरार घोषित करण्यात आले आहे.
सदरची कारवाई जे.एम. खिल्लारे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क बी विभाग ठाणे, डी.आर. दळवी दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क बी-१ विभाग ठाणे, श्रीमती. एच.एन. पवार दुच्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क बी-२ विभाग ठाणे, व्ही. एम. सापन दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क बी-३ विभाग ठाणे, एस.एस चव्हाण सहाय्यक दुय्यम निरीक्षक, बी.एल पाटील जवान ब.क्र. १९, ओ एच जाधव जवान ब.क्र.०९, एस.एस चांगण महिला जवान ब.क्र.१२४ इत्यादी सह हजर होते. सदर गुन्हयाचा पुढील तपास प्रविण तांबे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली डी. आर. दळवी दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क बी-१ विभाग ठाणे अधिक तपास करीत आहेत,