छापा टाकण्यास आल्याचे सांगून मेसवाल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी, पोलीस हवालदारचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Spread the love

छापा टाकण्यास आल्याचे सांगून मेसवाल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी, पोलीस हवालदारचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – पुण्यातून एक अतिशय धक्कादायक असा प्रकार पुढे येताना दिसतोय. उरळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पोलिस कर्मचाऱ्याने वर्दीचा धाक दाखवून मेस चालणाऱ्या महिलेला शरीरसुखाची मागणी केली. या महिलेने याकरिता नकार दिला, त्यावेळी पोलिसाने इथे छापा टाकण्यास आल्याचे सांगितले. यावेळी हा पोलीस कर्मचारी दारूच्या नशेत असल्याचाही आरोप करण्यात आलाय. या महिलेने सर्व घटना ही आपल्या मोबाईलमध्ये शूट केलीये. या घटनेने आता मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय. मिळालेल्या माहितीनुसार, हा पोलिस दारूच्या नशेत तिथे गेला होता. त्याने जवळीक साधत महिलेकडून अगोदर शरीरसुखाची मागणी केली. महिलेने नकार देताच तो हॉटेलमध्ये छापा टाकण्यास आल्याचे सांगत होता. महिला ही व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे की, तुम्ही इथे छापा टाकण्यास आला आहात तर मग तुमची इतर टीम कुठे आहे? तुम्ही पायामध्ये बूट पण घातले नाहीत, यावर तो पोलिस म्हणतो की माझ्या पायाला दुखापत झाल्याने म्हणून मी चप्पल घातलीये.

मला फोन आला होता म्हणून मी इथे आलो असे सांगतानाही तो पोलिस दिसत आहे. महिला यावेळी त्या पोलिसाला म्हणते की, तुमची वर्दी कुठे आहे? दारूच्या नशेत तुम्ही छापा कसा टाकू शकता? कितीवेळ झाला तुम्ही इथे धिंगाना करत आहेत. मात्र, यावेळी तो पोलिस कर्मचारी शांत बसताना दिसतोय. यावेळी व्हिडीओमध्ये महिलेने कोणालातरी फोन लावल्याचे बघायला मिळतंय. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी देखील हा व्हिडीओ शेअर केलाय. सुषमा अंधारे यांनी हा व्हिडीओ एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटले की, उरळी कांचन पोलीस स्टेशनचा पोलीस हवालदार गणेश रतन दाभाडे (हवालदार बिल्ला क्र. ३२१) याने मेसचे डब्बे पोहचवणाऱ्या महिलेकडे वर्दीचा धाक दाखवून शरीर सुखाची मागणी केली. संबंधित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील नोंदवली जात नाहीये. ही पोस्ट सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग केलीये. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर अनेकांनी संताप व्यक्त केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon