नालासोपाऱ्यातून धक्कादायक घटना समोर !

Spread the love

नालासोपाऱ्यातून धक्कादायक घटना समोर !

१३ वर्षांच्या अल्पवयीन आतेभावाने आपल्याच ५ वर्षांच्या मामेबहिणीची हत्या; मृतदेह रविवारी जंगलात सापडला, सीसीटीव्हीमुळे घटनेचा उलगडा

योगेश पांडे / वार्ताहर 

नालासोपारा – नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, १३ वर्षांच्या अल्पवयीन आतेभावाने आपल्याच ५ वर्षांच्या मामेबहिणीची हत्या केली आहे. रविवारी पाहटे चार वाजता या चिमुरडीचा मृतदेह एका जंगलात सापडला आहे, या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे या घटनेचा उलगडा झाला असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार घरातील सर्वजण तिचाच लाड करतात, माझा कोणी लाड करत नाही. हा राग मनात धरून, नालासोपार्‍यात एका ५ वर्षांच्या चिमुरडीची १३ वर्षाच्या अल्पवयीन आतेभावाने निर्घृणपणे हत्या केली असल्याची धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. रविवारी पहाटे ४ वाजता एका जंगलात या चिमुरडीचा मृतदेह सापडला.

सीसीटीव्ही कॅमेऱ्या मुळे हत्येचा उलगडा झाला असून, याबाबत पेल्हार पोलीस ठाण्यात अल्पवयीन आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शिद्राखातून खान – ५ असे हत्या झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. नालासोपारा पूर्व श्रीराम नगर परिसरात ती आपल्या कुटुंबासोबत राहत होती. तर १३ वर्षांचा आरोपी ही त्यांच्या घराच्या शेजारीच राहत होता. घरातील सर्वचजण तिचा लाड करतात आणि त्याचा कोणी लाड करत नाही, हा राग मनात धरून अल्पवयीन आतेभावानेच आपल्या मामेबहिणीची हत्या केली असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. पेल्हार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून, घटनेबाबत तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान अवघ्या तेरा वर्षांच्या मुलानं आपल्याच मामेबहिणीची हत्या केली आहे. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. कोणाचाही या घटनेवर विश्वास बसणार नाही, मात्र या मुलानं या चिमुरडीची हत्या केली, ही घटना सीसीटीव्हीमुळे समोर आली आहे, या चिमुरडीचा मृतदेह जंगलात आढळून आला आहे. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबाला प्रचंड धक्का बसला आहे. केवळ तिचाच सर्वजण लाड करतात आणि आपला कोणीच लाड करत नाही, या भावनेतून त्याने ही हत्या केल्याचं समोर आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon