ठाण्यात मोठा राडा; शिवसेना शिंदे गट अन् ठाकरे गट आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

Spread the love

ठाण्यात मोठा राडा; शिवसेना शिंदे गट अन् ठाकरे गट आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

योगेश पांडे / वार्ताहर 

ठाणे – ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये जोरदार राडा झाला आहे, यावेळी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात रविवारी शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते ठाण्यात पोहोचले, त्यावेळी आनंद आश्रम परिसरात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी तिथे शिवसेना शिंदे गटाचे नेते देखील पोहोचल्यानं शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते व कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी दोन्ही बाजुनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रविवारी ठाण्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा होता, शिवसेना ठाकरे गटाचे नेते शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी ते ठाण्यात दाखल झाले. मात्र आनंद आश्रम परिसरात येताच तिथे उपस्थित असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं.

यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. आनंद आश्रमात जाण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, पण आनंद आश्रम कोणत्या तरी खासगी व्यक्तीनं आपल्या नावावर करून घेतला आहे. तो आता दिघे साहेबांचा आश्रम राहिला नाही. मला आश्रचर्य वाटतं की आपल्या नावावर त्यांनी प्रॉपर्टी म्हणून तो करून घेतला आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांनी देखील शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधला. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, ज्यांना आपण दैवत मानतो, तिकडे जर कोणत्याही पक्षातील नेते जर नतमस्तक होण्यासाठी येत असतील तर मला असं वाटतं आपण त्यांचं स्वागत करायला पाहिजे, पण यांच्याकडे दुसरे मुद्दे राहिलेले नाहीत, त्यामुळे ते जर म्हणत असतील सगळं आमचंच आहे तर एवढं कमकुवत स्वत: समजत असतील तर ही दुर्दीवी गोष्ट आहे, असं केदार दिघे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon