पुणे पुन्हा हादरलं! चाकूचा धाक दाखवून तरुणीवर आळीपाळीने अत्याचार, अंगावरील सोनंही लुटलं; दोघांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
शिरुर – स्वारगेट बस डेपो अत्याचार प्रकरण ताजं असतानाच पुण्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे तरुणीवर अत्याचार करून तिच्या अंगावरील सोने लुटण्यात आलं आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही तरुणी तिच्या मामे भावासोबत रात्रीच्या वेळेस गप्पा मारत बसली होती, त्यावेळी दारू पिऊन आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखवत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसंच आळीपाळीने युवतीवर अत्याचार केला. यानंतर तरुणीच्या अंगावरील सोनंही काढून घेतलं गेलं.
रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. यानंतर रांजणगाव पोलिसांनी तात्काळ दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अमोल नारायण पोटे (२५) आणि किशोर रामभाऊ काळे (२९) अशी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.