तहसीलदार कपिल घोरपडे यांच्यावर लाच मागणी प्रकरणी गुन्हा दाखल; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Spread the love

तहसीलदार कपिल घोरपडे यांच्यावर लाच मागणी प्रकरणी गुन्हा दाखल; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

रायगड – रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील तहसीलदार कपिल तुकाराम घोरपडे यांच्यावर लाच मागणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडच्या पथकाने ही कारवाई केली. तक्रारदाराने ३ फेब्रुवारी २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तहसीलदार घोरपडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, पोलादपूर तालुक्यातील पार्टे कोंड येथील जमिनीच्या तफावतीबाबत दाखल केलेल्या दाव्याचा निर्णय देण्यासाठी तहसीलदार घोरपडे यांनी ३,००,०००/- रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ही रक्कम २,५०,०००/- रुपये करण्यात आली. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता तहसीलदार घोरपडे यांनी प्रत्यक्षपणे लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. ५ फेब्रुवारी आणि १८ फेब्रुवारी २०२५ रोजी ने सापळा रचला. मात्र, तहसीलदार घोरपडे यांना संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही. परिणामी, त्यांच्यावर लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपींवर पोलादपूर पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक १०/२०२५

कलम भारतीय भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम ७

आरोपी: कपिल तुकाराम घोरपडे (वय ३९), तहसीलदार, पोलादपूर, रायगड (वर्ग-१)

सध्या राहण्याचा पत्ता: मंगलमूर्ती कॉम्प्लेक्स, बी विंग, फ्लॅट क्रमांक ४०८, चौथा मजला, पोलादपूर, रायगड, सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड-अलिबाग यांच्या पथकाने केली. सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. शशिकांत पाडावे, पोलीस उपअधीक्षक, निशांत धनवडे, पोलीस निरीक्षक संतोष भिसे, पोलीस निरीक्षक विनोद जाधव, स. फौ. अरुण करकरे, स. फौ. महेश पाटील, पोलीस हवालदार, सचिन आटपाडकर, पो. शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र संजय गोवीलकर, अपर पोलीस अधीक्षक, प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र सुहास शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र, तहसीलदार घोरपडे यांच्याविरुद्ध लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने शासन सेवेतील भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत हा मोठा टप्पा मानला जात आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. लाचलुचपत विभागाने भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आणखी कठोर पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon