नौपाडा पोलीसांकडून सराईत चोरांना अटक; वाहन चोरी व घरफोडीचे एकूण १० गुन्हे उघड करण्यात पोलीसांना यश
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अष्टविनायक मोबाईल सेंटरचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी रिक्षामध्ये येऊन महागडे मोबाईल आणि दुकानात ठेवलेली रोख रक्कम चोरी केली होती. दूकान मालक पराग बळवंत रावल यांच्या फिर्यादिवरून पोलीसांनी चोरिचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुआत केली. अप्पर पोलिस आयुक्त विनायक देशमुख, पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे, सहा.पोलिस आयुक्त श्रीमती प्रिया ढमाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, पोलिस निरिक्षक क्राइम कुंभार यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शानाप्रमाणे तपास अधिकारी यांनी तपास सुरु केले असता सदर गुन्ह्यातील वांटेड आरोपीचा शोध घेण्यासाठी घटनास्थळावरिल तसेच आरोपीच्या येणा – जाण्याच्या मार्गावरिल ४० ते ५० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून प्राप्त फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुंह्यातील आरोपी सलमान अली अहमद अली शेख व अहमद रजा अबूबकर सिद्दीकी हे उल्हासनगर येथे असल्याची माहिती मिळाली.
सदर आरोपिंची माहिती घेत असताना पोलीसांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर आरोपी नौपाडा परिसरात पुन्हा चोरी करण्याची तयारी करत आहेत. मिळालेल्या बातमीच्या आधारे पोलीसांनी ठाण्यातिल तिनहात नाका येथे सापळा रचून दोन्ही आरोपी सलमान अली अहमद अली शेख (२१) आणि अहमद रजा अबूबकर सिद्दीकी (३३) यांना अटक करून त्यांच्याकडे चौकसीदरम्यान त्यांचे अन्य साथिदार साहिल कुकरेजा,राजवीर व इमरान शेख यांचेसह नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीचे आणि घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघड झाले.सदर आरोपी चोरीच्या दुचाकी आणि रिक्षा वापर करून घरफोडी करायचे. सदर आरोपिंकडून तपासादरम्यान ४ ऑटोरिक्षा,एक होंडा शाइन बाइक,१० मोबाईल फोन,कार टेप व रोख रक्कम मिळून एकूण ५, ६०, ००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.