मुंबई पोलिसांची कारवाई; ३ ठिकाणी बांग्लादेशी नागरिक अटकेत
मुंबई – परिमंडळ ४, मुंबई अंतर्गत अनधिकृत बांग्लादेशी नागरिकांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार भोईवाडा, आर.ए. किडवाई मार्ग आणि अँटॉप हिल पोलीस ठाण्यांनी गुप्त माहितीच्या आधारे विशेष मोहिम राबवली. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत ते बांग्लादेशी असल्याचे निष्पन्न झाल्याने परकीय नागरिक कायदा १९४६ अन्वये गुन्हे नोंदवून त्यांना अटक करण्यात आली.
सदर बांगलादेशीय संशयितांवर . भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक: ४५/२०२५ दाखल करण्यात आला असून रुकसाना बेगम मोह. अबुल खान (३० वर्षे), जेसोर, बांग्लादेश
तसेच आर.ए. किडवाई मार्ग पोलीस ठाणे, गुन्हा क्रमांक: ३५/२०२५ असून निजाम इकराम शेख (४१ वर्षे), नोडाईल, खुलना, बांग्लादेश तर अंटॉप हिल पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक: ५१/२०२५ असून मिटो इसम शेख (३८ वर्षे), दिघोलिया, खुलना, बांग्लादेश
सदर कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण, अप्पर पोलीस आयुक्त अनिल पारस्कर, तसेच पोलीस उप आयुक्त रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक मोरेश्वर धायगुडे, सपोनि अमुल बच्छाव, सपोनि होळकर आणि त्यांच्या पथकांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.