संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट; हत्या प्रकरणातील ६ आरोपी सोबतच दिसल्याचं सीसीटीव्हीफुटेज समोर

Spread the love

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट; हत्या प्रकरणातील ६ आरोपी सोबतच दिसल्याचं सीसीटीव्हीफुटेज समोर

योगेश पांडे/वार्ताहर 

बीड – बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली असून, या प्रकरणातील ६ आरोपी सोबतच दिसल्याचं एका सीसीटीव्हीमधून समोर आलं आहे. आवादा कंपनीला २ कोटी रुपयांची खंडणी मागितली, त्यावशीच म्हणजेच २९ नोव्हेंबरला हे सर्व आरोपी सोबतच असल्याचं सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यानं या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. वाल्मीक कराडने विष्णू चाटेच्या मोबाईलवरून दोन कोटी रुपयांची खंडणी आवादा पवनचक्की प्रोजेक्टच्या सुनिल शिंदे यांना मागितली होती. याच कार्यालयामध्ये बसून ती मागितली होती असं समोर आलं आहे. खंडणी मागण्या अगोदर आरोपींची बैठक झाली. यामध्ये आरोपी वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, सुधीर सांगळे हे आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्या सोबत दिसतोय.

दरम्यान, २९ नोव्हेंबरला ही बैठक झाली. वाल्मीक कराडने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. “सुदर्शन ज्या पद्धतीने सांगत आहे त्या पद्धतीने चला, नस्ता येणाऱ्या काळामध्ये वाईट परिणाम होतील” अशी धमकी याचवेळीदिली होती. विष्णू चाटेच्या मोबाईलवरून वाल्मीक कराडने सुनील केदु शिंदे या मॅनेजरला फोन करून धमकी दिली होती. खंडणी मागण्या अगोदर या आरोपींची अगोदर केज येथील आरोपी विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये बैठक झाली. बैठकीनंतर सर्व आरोपींनी खंडणी मागण्यासाठी रवाना झाले. दरम्यान २९ नोव्हेंबरलाच शिवाजी थोपटे, सुनील केदु शिंदे यांना खंडणी मागितली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon