केडीएमसीच्या माध्यमातून सुमारे ७ हजार स्केअर फुट जागेमध्ये उभारलेले फिजीओथेरेपी व बहुविद्याशाखीय पुर्नवसन केंद्र हे दिव्यांग व्यक्तींसाठी वरदान होय – खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे

Spread the love

केडीएमसीच्या माध्यमातून सुमारे ७ हजार स्केअर फुट जागेमध्ये उभारलेले फिजीओथेरेपी व बहुविद्याशाखीय पुर्नवसन केंद्र हे दिव्यांग व्यक्तींसाठी वरदान होय – खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून सुमारे ७ हजार स्केअर फुट जागेमध्ये उभारलेले फिजीओथेरेपी आणि बहुविद्याशाखीय पुर्नवसन केंद्र हे दिव्यांग व्यक्तींसाठी वरदान होय असे प्रतिपादन मा.खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सांगळेवाडी कल्याण (पश्चिम) येथे उभारलेल्या फिजीओथेरेपी आणि बहुविद्याशाखीय पुर्नवसन केंद्राच्या लोकार्पण समयी त्यांनी हे प्रतिपादन केले. कल्याण व नजीकच्या परिसरातील दिव्यांग व्यक्तींना फिजिओथेरपी किंवा इतर उपचारासाठी खाजगी हॉस्पिटल शिवाय पर्याय नव्हता त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी पुढाकार घेऊन दिव्यांग व्यक्तींसाठी सुरु केलेल्या या आरोग्य सुविधेसाठी त्यांनी आयुक्तांचे कौतुक केले. दिव्यांग व्यक्तींना लागणारी उपकरणे देण्याचे विचार करु, आणि येणा-या कालात अधिक चांगली कामे करु, अशा शब्दात त्यांनी उपस्थितांना आश्वासित केले. कल्याण पूर्वेच्या आमदार सुलभा गायकवाड आणि कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी देखील त्यांच्या भाषणात महापालिकेचा दिव्यांग सेंटर उपक्रम हा कौतुकास्पद असल्याचे सांगत, या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

दिव्यागांसाठी महापालिकेने एक पाऊल पुढे उचलले असून, सुमारे ३५०० दिव्यांग व्यक्तींना महापालिकेकडून निवृत्त वेतन दिले जाते, अशा शब्दात अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर यांनी महापालिकेचे प्रशंसा केली.

दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध उपक्रम योजना यांची नियोजन करून दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महानगरपालिकेने पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प सुरू केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. या लोकार्पणवेळी परिमंडळ -३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी, महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव ,कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे,कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ, महापालिकेचे माजी पदाधिकारी, माजी पालिका सदस्य ,नागरिक व इतर मान्यवर उपस्थित होते.

या फिजीओथेरेपी आणि बहुविद्याशाखीय पुर्नवसन केंद्रात महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या विविध व्याधीग्रस्त दिव्यांगांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत मे. आधार रिहॅबिलिटेशन सर्विस या सेंटरद्वारे अनुषंगिक आरोग्य सुविधा निशुल्क पुरविण्यात येणार आहे. महापालिकेकडे नोंदणीकृत नसतील अशा दिव्यांगाना व महापालिका क्षेत्रा बाहेरील दिव्यांग व्यक्तींना रु. ५००/- या दराने विविध उपचारांचा लाभ या सेंटरमध्ये घेता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon