अवैधपणे राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांवर कारवाई
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – आरसीएफ पोलीसानी एका बांग्लादेशी महिलेविरोधात गुन्हा नोंद करुन तिला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव रेशमा मुजीबुर रहमान (२८ वर्ष) सांगण्यात येत आहे.
अपर पोलिस आयुक्त डॉ महेश पाटिल आणि परिमंडल ६ चे पोलिस उपायुक्त यांच्या निर्देशावरुन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश कुमार गाठें यांच्या मार्गदर्शनाखाली आरसीएफ पोलिसांनी रेशमा मुजीबुर रहमान २८ वर्ष हिला अटक केली आहे. ती महिला बांग्लादेशी आहे म्हणून पोलिसांनी तिच्या विरोधात गु.नोंद क्रमांक ०३/२०२५ कलम- नियम ३ सह ६ पारपत्र (भारतात प्रवेश) १९५० सह परिच्छेद ३ (१) (अ) परकीय नागरिक आदेश १९४८ सह कलम १४ परकीय नागरिक कायदा १९४६ अन्वये दाखल करुन पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेशमा मुजिबूर रहमान ही बांग्लादेशी महिला रूम नंबर ६०७, बिल्डिंग नंबर ३ विष्णुनगर माढा वसाहत, विष्णुनगर, मुंबई ७४ या ठिकाणी राहत होती. तिचे मूळ गाव साकारीपुता, बेनापोल, तहसील- सारसा,जिल्हा – जशोर, डिविजन – खुलना, देश- बांगलादेश आहे. या प्रकरणाची अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे, पो.ह.वाक्षे, पो.ह.पाटील, पोशि येळे, पो.शि.पालवे, मपोशि नरवडे यांचे पथक करत आहे.