ट्रकच्या धडकेत २० वर्षाची तरुणी मृत्युमुखी

Spread the love

ट्रकच्या धडकेत २० वर्षाची तरुणी मृत्युमुखी

रवि निषाद/प्रतिनिधि

मुंबई – मुलुंड पश्चिम येथील टाटा पॉवरच्या समोर श्रीराम सर्विस रोडवर एका टाटा ट्रकच्या धडकेत २० वर्षीय तरुणी मृत झाली आहे. या प्रकरणात मुलुंड पोलिसांनी ट्रक चालक विरोधात गुन्हा नोद करुन त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २ जानेवरी रोजी मुलुंड पश्चिम येथे टाटा पॉवर सर्विस रोडवरती कुमारी शालू यादव (२० वर्ष) तिचा काका अमरजीत मनीष यादव वय (३७ वर्ष) पिरामल टॉवर, एलबीएस रोड, मुलुंड पश्चिम मुंबई ८०, या ठिकाणी वॉचमन चे काम करीत असल्याने त्याना जेवनाचा डबा घेऊन जाण्यासाठी तिच्या राहत्या घरातून सकाळी ११ वाजताच्या दरम्यान निघाली असता ती श्रीराम पाडा सर्विस रोड या ठिकाणी आली असता पाठीमागून येणाऱ्या टाटा कंपनीच्या ट्रकने भरधाव वेगात पाठीमागून जोराची धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली तिला खाजगी ॲम्बुलन्स ने अग्रवाल जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले असता तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यावर मृत असल्याचे नातेवाईकांना सांगितले. मयत मुलीच्या वडिलांचा जबाब नोंद केला असून त्यांनी ट्रक वरील ड्रायव्हरच्या विरोधात तक्रार दिल्याने त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पोलिसांनी चौकशी करुन आरोपी ट्रक चालकाला अटक केली आहे. सदर गुन्ह्यामध्ये पोलिस पोलिस उपनिरीक्षक नवनाथ ढेकळे हे दिवसपाळी पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक शिवाजी चव्हाण यांचा मार्गदर्शनाखाली अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon