अज्ञात मृत्यू पावलेल्या वारसदारांचा शोध सुरू
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – गोवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक ५५ वर्षीय व्यक्ती बेवारसपणे बेसुद्ध अवस्थेत गोवंडी स्टेशन जवळ १२/११/२०२४ रोजी पोलिसाना मिळून आला. पोलिसांनी त्याला तात्काळ शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.त्या वेळी तेथील डॉक्टरानी त्याला उपचारासाठी एमएमडब्लू ०२ मधे दाखल करुन घेतले. उपचारादरम्यान १८/११/२०२४ रोजी त्या अज्ञात व्यक्तीची तब्येत खालावली आणि त्याटच त्याचा मृत्यु झाला. पोलिसांनी सदर मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदन करुन शवगृहात ठेवले आणि त्याचे फिंगरप्रिंट फोटोग्राफ काढून सर्व पोलिस ठाण्यास देऊन त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. पण सदर मृतदेहाची ओळख अजूनपर्यंत पटलेली नाही. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर या संदर्भात काही कोणास माहीत असेल तर लवकरात लवकर गोवंडी पोलिसांना संपर्क करावे किंवा पोलिस उपनिरीक्षक अनिल पाठारे यांच्याशी संपर्क करावे असे सांगितले आहे.