माजी आमदार चाकोतेंची फसवणूक; सख्या भावासह तिघांविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
सोलापूर – शेत जमीनीवर परस्पर नाव नोंदवून मोठ्या भावानेच तहसिलदाराच्या मदतीने माजी आमदाराची फसवणुक केल्याची घटना उघडकिस आली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेव बाबुराव चाकोते, जयशंकर महादेव चाकोते आणि तत्कालीन तहसिलदार उत्तर सोलापूर असे आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहर उत्तरचे माजी आमदार विश्वनाथ बाबुराव चाकोते यांचे शेतजमीन उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे गट नं.११२/१ अशी असून त्यावर विश्वानाथ चाकोते यांच्यासह मोठा भाऊ महादेव चाकोते यांच्यासह चारजणांचे नावे होते. ती जमीन कब्जे वहिवाईटीत असताना मोठा भाऊ महादेव चाकोते याने कसलीच माहिती न देता नाव कमी करून परस्पर शेतजमीनीवर तत्कालीन तहसिलदार उत्तर सोलापूर यांच्या मदतीने स्वतःचे आणि त्यांचा मुलगा जयशंकर महादेव चाकोते यांचे नाव लावून घेतले. तसेच नवसमता ट्रान्सपोर्ट या वडिलोपार्जित व्यवसायाच्या नावाने हैदराबाद येथील ऑटो नगर मध्ये असलेली जमीन परस्पररित्या नाव वगळून कोणतीही माहिती न देता मूळ कागदपत्रे गहाळ करून नव्याने बनावट कागदपत्रे तयार करून बाबुराव चाकोते यांचा मीच एकटा वारसदार आहे असे भासवून अधिकार्यांशी संगनमत करून फसवणुक केली तसेच तुम्ही कसे जमीन घेता ते बघतो अशी फिर्याद सोलापूरच्या सदर बझार पोलीस ठाण्यात गुरनं.९७५/२०२४ प्रमाणे आणि हैदराबाद येथील हयात नगर पोलीसांकडे गुरनं.६८७/२०२१ प्रमाणे रितसर दाखल झाली करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.