यूपी, एमपी नंतर आता महाराष्ट्र?

Spread the love

यूपी, एमपी नंतर आता महाराष्ट्र?

एमबीबीएस परीक्षांचे पेपर लीक झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – एमबीबीएस परीक्षांचे पेपर लीक झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. आंबेजोगाई आणि मुंबईत अशा दोन्ही ठिकाणी पेपर फुटल्याची बाब समोर येत आहे. सोमवार पासून सुरू झालेल्या परीक्षांमध्ये फार्माकॉलॉजी आणि पॅथॉलॉजी या दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे पेपर लीक झाल्याची विद्यापीठाकडे ऑनलाईन तक्रार करण्यात आल्याने परीक्षा वेळेवर सुरू होऊ शकल्या नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांना याचा मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. दरम्यान हे प्रकरण गंभीर असल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्रशासनाकडून म्हसरूळ पोलीस ठाणे आणि सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एकीकडे पोलीस तपास करत असतानाच दुसरीकडे विद्यापीठानेही स्वतंत्र तीन समित्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे विद्यापीठातील सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असूनही पेपर लीक होत असल्याने हे प्रकरण संशयास्पद आहे. चार पैकी तीन पेपर पुन्हा घेण्याची वेळ विद्यापीठ प्रशासनावर आली आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एमबीबीएस च्या परीक्षेतील फुटी प्रकरणी चौकशी सुरू असून फार्माकॉलॉजी आणि पॅथॉलॉजी विषयांचे पेपर फुटल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला ईमेलद्वारे तक्रारी मिळाल्या होत्या. आंबेजोगाई आणि मुंबईत अशा दोन्ही ठिकाणी पेपर फुटल्याची बाब समोर येत आहे. नाशिक पोलिसांसह सायबर पोलिसांकडून चौकशी सुरू असून आरोग्य विद्यापीठांनेही स्वतंत्र तीन समित्यांद्वारे चौकशी सुरू केली आहे. चार पैकी तीन पेपर पुन्हा घेण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे. खबरदारी घेऊनही पेपर फुटल्यानं विद्यापीठासह परीक्षा केंद्राचा कारभार चर्चेत आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon