भिवंडीत अनेक ठिकाणी तर गुजरातच्या सौराष्ट्र क्षेत्रातही भूकंपाचे सौम्य झटके

Spread the love

भिवंडीत अनेक ठिकाणी तर गुजरातच्या सौराष्ट्र क्षेत्रातही भूकंपाचे सौम्य झटके

योगेश पांडे/वार्ताहर 

भिवंडी – भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याची माहिती आहे. सरवली पाडा, टेमघर पाडा, सोनाळे, भादवड इत्यादी गावात दोन ते तीन सेकंद कंपन जाणवले, अशी माहिती मिळत आहे. जमीन हादरल्याचे झटके जाणवल्याने गावातील नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. कंपन नक्की कशाचे होते हे अजून स्पष्ट नसल्याची माहिती तहसीलदार अभिजित खोल यांनी दिली आहे. याबाबत हैदराबाद येथे रिपोर्ट पाठवून माहिती घेणार, असं तहसीलदरांनी सांगितलं आहे. संबंधित गावात महसूल प्रशासनाचे कर्मचारी दाखल झाले. विशेष म्हणजे फक्त भिवंडीच नाही तर गुजरातच्या सौराष्ट्र क्षेत्रातही मंगळवारी संध्याकाळी भूकंपाचे झटक जाणवले आहेत. आयएसआरच्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ३.२ रिक्टर स्केल इतकी होती. दरम्यान, तिथल्या गिर सोमनाथ जिल्हा प्रशासनाकडे भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जैविक किंवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप आलेली नाही. आयएसआरच्या अंदाजानुसार, संध्याकाळी ६.०८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

गुजरातच्या भूकंपाचे केंद्र गिर सोमनाथ जिल्हायातील तलाला परिसराजवळ २ किमी अंतरावर होतं. विशेष म्हणजे जपान देश देखील भूकंपाने हादरला आहे. जपानच्या इशिकावा प्रांतात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ६. ४ इतकी होती, अशी माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon