कल्याणच्या व्हर्टेक्स या गगनचुंबी इमारतीत अग्नितांडव, अग्निशमन यंत्रणा बेभरवशी
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – कल्याण पश्चिमेतील व्हर्टेक्स या नामकिंत गगनचुंबी हाय फोफ्राईल सोसयटीतील १५ व्या मजल्यावर आगडोंब असल्याचे चित्र दिसत होते. १५ व्या मजल्यावर संतोष शेट्टी यांच्या घराला लागलेली आग वरच्या मजल्यावर पसरली होती. सदर आग लागल्याची घटना मंगळवारी सांयकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. सुदैवाने यात जिवित हानी झाली नाही. अचनाक आग लागल्यानंतर या आगीने मोठा पेट घेतला आणि धुराचे लोट पसरले. लांब पर्यंत या धुराचे लोट दिसत होते. महत्त्वाची बाब म्हणजे वेळेत आगीवर नियंत्रण न मिळाल्याने १५ व्या मजल्यावरील आगीचे लोट हवेमुळे डॉ. सुमित श्रीवास्तव यांच्या १६ व्या आणि १७ व्या मजल्या वरील डॉ. नितीन झबक यांच्या घरापर्यंत पोहचली, यामुळे या आगीत तीन मजल्यावरील सदनिका जळून खाक झाल्या आहेत.
कल्याणमध्ये उंच इमारती हे पेव फुटले आहे. या उंच इमारतीमधील आग विझवण्यासाठी केडीएमसीकडून ५५ मीटर लांबीची शिडी असलेली अद्यावत गाडी घेण्यात आली होती, मात्र ही गाडी बंद असल्याने आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागला मोठी कसरत करावी लागली. तर अग्निशमन दलाच्या गाड्या उशिराने आल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. यामुळे केडीएमसीची अग्निशमन यंत्रणा फोल ठरली आहे.
कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची माहिती घेतली. तसेच ५५ मीटर शिडी असलेली अग्निशमन गाडी तांत्रिक बिघाडामुळे कार्यान्वित नसल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे ठाणे मनपाकडून गँल्डर अग्निशमन गाडी पाचरण करण्यात आली. पोलीस प्रशासन व केडीएमसी परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचे आयुक्त यांनी सांगितले. इमारतीतील रहिवाशांना सुखरुपपणे बाहेर काढलं असल्याचे आयुक्तांनी सांगितले. याआगीच्या घटनास्थळी मनपा आधिकारी कर्मचारी असा मोठा फौजफाटा उपस्थित होता. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना तब्बल ३ तासानंतर आग विझवण्यात यश आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवले आहे.