पंतनगर पोलिसांकडून २४ तासात दोन बेपत्ता मुलींचा शोध
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – घाटकोपर येथील पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींच्या अचानक बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाची उकल पोलिसांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर रमाबाई कॉलनीत आपल्या कुटुंबियांसोबत राहणाऱ्या आणि येथील गुरुकुल हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुली २० नोव्हेंबर रोजी अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर आहवाड यांच्या सूचनेवरून पोलीस उपनिरीक्षक सुभाष हमरे व महिला पोलिस कर्मचारी सोनाली शिंदे याना त्या हरवलेल्या मुलींचा शोध घेण्याचे आदेश दिले. हमरे यांनी त्यांच्या मोबाइलच्या माध्यमातून त्यांच्या पालकांची, त्यांच्या कुटुंबीयांची आणि त्यांच्या मित्रांची चौकशी सुरू केली. हे दोघेही दिल्लीत असल्याची माहिती हमरे यांना मिळताच त्यांनी तात्काळ दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला असता त्या दोघीही बेपत्ता मुलींचा शोध घेण्यात आला असून, संबंधित पोलिसांच्या माध्यमातून त्यांना सुरक्षितपणे दिल्लीतील महिला बालगृहात ठेवण्यात आले आहे. पोलिसांची ही तत्परता पाहून त्या तातडीने पोलीस उपनिरीक्षक वाधमोडे आणि पथक दिल्लीला रवाना करण्यात आलेले आहे. आपल्या मुली सुखरूप सापडल्याने कुटुंबीयांनी संपूर्ण पंतनगर पोलिसांचे आभार मानले असून त्या कुटुंबाबियांनी आनंद व्यक्त केला आहे.