नागपूरमध्ये दुचाकीवरुन तब्बल दीड कोटी जप्त करण्यात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना यश

Spread the love

नागपूरमध्ये दुचाकीवरुन तब्बल दीड कोटी जप्त करण्यात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना यश

योगेश पांडे/वार्ताहर 

नागपुर – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरु झाला आहे. सर्वत्र प्रचार सभा, रोड शो सुरु आहे. उमेदवार रात्रंदिवस एक करत आहेत. त्याचवेळी पोलीस आणि निवडणूक आयोगाचे पथकही डोळ्यात तेल घालून सक्रीय आहे. पैसे, मद्य यावर लक्ष ठेऊन आहे. या पार्श्वभूमी नागपुरात मोठी रक्कम जप्त झाली आहे. रोकड एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारावर तहसील पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली. यात एक कोटी ३५ लाख रुपये दुचाकीने जात असताना बॅगमधून मिळून आले. तसेच वाशिम शहर पोलिसांनी १२ नोव्हेंबर एका व्यापाऱ्याकडून २५ लाखांची रोकड जप्त करून जिल्हा कोषागारात जमा केली. नागपूरमधील सेंट्रल अव्हेन्यू रोडवर दुचाकीवरून जात असताना पोलिसांनी संशयित्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्यामुळे विचारपूस केली असता त्यांनी उडवाळूची उत्तरे दिली. मात्र त्याच्या बॅगेमध्ये एक कोटी ३५ लाख ५९ हजार रुपये मिळून आले. या पैशांचा कोणताही खुलासा ते करु शकले नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या पैशांचा गैरवापर होण्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे ही रोकड जप्त करुन आचारसंहिता सुरू असल्याने निवडणूक विभागाकडे स्वाधीन करण्यात आली.

राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे राज्यभरात करवाईचे सत्र सुरु आहे. १५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू जप्त करण्यात आले आहे. एकूण ४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिलॲपवर एकूण ४ हजार ७११ तक्रारी प्राप्त झाल्या आहे. त्यापैकी ४ हजार ६८३ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon