कोळसेवाडी परिसरात चैन स्नैचिंग करणाऱ्या युवकाला पोलीसांनी ठोकल्या बेड्या; कार जप्त
योगेश पांडे/वार्ताहर
कल्याण – कोळसेवाडी पोलिस ठाण्याचा हद्दीत फिर्यादि यांच्या गळ्यातील ३ तोळ्याची सोन्याची चैन एका पांढऱ्या रंगाच्या कारमधील चालकाने जबरी चोरी करून तेथुन पसार झाल्याची नोंद गुरुवारी करण्यात आली. सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि कारच्या नंबरची तांत्रिक पडताळणीच्या आधारे तपासणी करून गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार आणि चालक दोघांना ताब्यात घेतले आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुर्यकांत जगदाळे कल्याण यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, पोलीस निरीक्षक गुन्हे गणेश न्ह्यायदे, पोलीस निरीक्षक प्रशासन नाईक कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक संदीप भालेराव, पोलीस उपनिरीक्षक मदने व डीबी पथकाचे पो हवा कदम,भामरे, जाधव, बुधवंत, पोलीस शिपाई सोनवणे यांच्या पथकाने केली.