खान समीम बानो यांनी यांचा मानखुर्द शिवाजी नगरमध्ये प्रचारात आघाडी
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबईतील सर्वात बहुचर्चित आणि अतिसंवेदनशील असलेल्या मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून या विधानसभा निवडणूकीत अनेक दिग्गज आपले नशीब आजमावत आहेत, याच भागातील प्रख्यात समाजसेविका आणि सदाय निसवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष खान समीम बानो या ही निवडणूक लढवणार आहेत. २०२४ च्या या निवडणुकीच्या लढाईत त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे आणि त्यांना परिसरातील जनतेचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समीम बानो खान यांनी काँग्रेसमध्ये मुंबई स्तरावरील पदावर काम केल्यानंतर समाजवादी पार्टीच्या मुंबई महिला अध्यक्षपदावर काम केलं आहे. याशिवाय १५ वर्षे सदाय निसवा मंडळ आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून श्रीमती खान गोरगरीब जनतेच्या सुख-दु:खात सहभागी होऊन काम करत असतात. मात्र यावेळी परिसरातील जनतेच्या मागणीवरून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून हा परिसर नशामुक्त करण्याचा विडा उचलला असून मानखुर्द शिवाजी नगर परिसर पूर्णपणे नशामुक्त करणे हे त्यांचे पहिले प्राधान्य राहणार आहेत. या भागातील प्रत्येक समस्या श्रीमती खान यांना माहीत आहे. गेल्या ४५ वर्षापासून इथे बाहेरचे लोक येऊन निवडणूक लढवतात, जिंकतात आणि जनते साठी काहीच करत नाहीत, याचाच परिणाम म्हणजे शिवाजी नगर गोवंडी परिसर नशेच्या विळख्यात सापडला आहे. हा परिसर मला ओळखतो, मी सर्वांसाठी वेळेवर उपलब्ध राहते. डम्पिंग ग्राउंड आणि एसएमएस कंपनीच्या दुर्गंधीमुळे जनता आजारांना बळी पडते. या सर्व प्रश्नांबाबत आजपर्यंत कुठल्याही नगरसेविका,आमदार किंवा खासदाराने आवाज उठवला नाही. या भागातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे ही श्रीमती खान यानी सांगितले आहे. त्यांच्या प्रचारात जनता मोठा प्रतिसाद देऊन त्यांना आपले आशीर्वाद देत आहेत आणि त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे.