वसईमध्ये ३ वर्षाच्या मुलाचे अपहरण; ४ तासात पोलिसांनी महिला आरोपीला केले गजाआड
रवि निषाद/प्रतिनिधि
पालघर – पालघर जिल्हातील वसई पोलिसांच्या हद्दीत एका ३ वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्याऱ्या महिलेला वसई पोलिसांनी ४ तासात अटक करुन सदर मुलाची सुखरूपपणे सुटका केल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, वसई येथील गवराइपाडा गावात राहणाऱ्या एका महिलेने वालीव पोलिस ठाण्यात येऊन सांगतले की, त्यांच्या ३ वर्षाच्या मुलाचे १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कोणीतरी अपहरण केले आहे. सदर घटनेचे गांभीर्य पाहुन पोलिसांनी तात्काळ गुन्हा क्रमांक ५३७/२०२४ कलम १३७(२) बीएनएस प्रमाणे नोंद करुन दोन पथके तयार करून वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराज रणवरे यानी या दोन्ही पथकाला त्वरित घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज काढून तपास करण्याचे निर्देश दिले. पोलिस सूत्रांनी सांगतले की, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक व मानवी तपास यंत्रणाद्वारे एका संशयित महिलेचा शोध घेत बांद्रा रेल्वे टर्मिनस गाठले. त्या ठिकाणाहून सदर महिला सबरिन मोहम्मद अली शेखला ताब्यात घेऊन तिची विचारपूस केली असता ती काहीच सांगण्यास तयार न्हवती. पोलिसांनी अधिक कठोरपणे चौकशी केली असता त्यांच्या सांगण्यानुसार पोलिसांनी जिथे तिने मुलाला लपवुन ठेवले होते तिथे जाऊन त्या बालकाची सुखरूप सुटका करून सबरिन मोहम्मद अली शेखला अटक केली. सदर कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराज रणवरे यांचा मार्गदर्शानाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पंडित म्हस्के,विश्वासराव बाबर, पोलीस उपनिरीक्षक किरण कुमार ठोंबरे, दीपक कुमार, आशुतोष चव्हाण, कर्मचारी सचिन दोरकर, मनोज मोरे,किरण म्हात्रे,महिला पोलिस कर्मचारी ममता पाटिल आणि दिपाली मसालनी यांनी केली.