महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याकडून सहकाऱ्याच्या पत्नीची चार लाख रुपयांची फसवणूक
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – चेंबूर महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागाच्या एका शाळेतील महिला कर्मचाऱ्याने मनपा कर्मचाऱ्याच्या पत्नीसोबत चार लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने आशा स्टीफन मॅसी यांनी लेखी स्वरुपात तक्रार दिली आहे आणि आपले पैसे परत मिळावेत यासाठी सर्व संबंधित विभागांकडे तक्रार केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूर पश्चिम येथील पी.एल.लोखंडे मार्ग येथील मनपा शाळेत काम करणारी अनिता रतन लोखंडे नावाची महिला शिपाही म्हणून कार्यरत आहे. याच शाळेत माळी म्हणून काम करण्याऱ्या एका कर्मचाऱ्याच्या पत्नीची अनीताने ४ लाखाला चुना लावले आहे. तिच्या मुलाच्या उपचारासाठी ४ लाखांच्या रुपयांची गरज आहे. असे सांगून आशा मैसी यांच्याकड़े मागणी केली होती. आशा एका फंडामध्ये सदस्य आहे. त्या फंडाचे पैसे आपापसात आणि त्याच ग्रुपच्या महिला सदस्यांना त्यांच्या गरजेनुसार देतात. आशा स्टीफन मॅसी यांनीही अनिता लोखंडेच्या जाळ्यात अडकून त्यांच्या फंडातून पैसे काढून २८ जुलै २०२३ रोजी अनिताला ४ लाख दिले होते. एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरी अनिताने आशाला पैसे न दिल्याने आशाने या प्रकरणाची तक्रार पालिका शिक्षण विभागाकडे केली. त्या नंतर टिळक नगर पोलिसांनी अनिता विरुद्ध ३०/०३/२०२४ रोजी एनसीआर क्रमांक ४८७/२०२४ ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. अनिताचा मुलगा एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने तीने इतर अनेक लोकांच्या सोबतही अशीच फसवणूक केल्याचे सांगितले जात आहे. आता पुन्हा एकदा आशा यांनी महापालिका शिक्षण विभाग आणि स्थानिक पोलिसांकडे लेखी तक्रार केल्याचे सांगण्यात येत आहे.