खुनाच्या गुन्ह्यातील पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीकडून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पोलिसांनी आरोपी संजय मानेला केली अटक

Spread the love

खुनाच्या गुन्ह्यातील पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीकडून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पोलिसांनी आरोपी संजय मानेला केली अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

सांगली – एकीकडे कोलकाता आणि बदलापूरातील लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी समाजमन हादरले असताना आता सांगली शहर देखील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने हादरले. एका अल्पवयीन मुलीवर ३४ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. संजयनगर पोलिसांनी तातडीने पाऊले उचलत आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतले. घटनेनंतर नागरिकांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी करीत पोलीस स्टेशन समोर घोषणाबाजी केली. काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, भाजपा नेते शिवाजी डोंगरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत आरोपावर तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

सांगली शहरात एका १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची प्रकार उघडकील आला. या नंतर नागरिकांनी पोलिस ठाण्यासमोर घोषणा बाजी केली. त्यानंतर या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली. या घटनेनंतर तातडीने संजयनगर पोलिसांनी आरोपी संजय माने यास गुन्हा दाखल होताच दीड तासात ताब्यात घेतले. संशयित आरोपी संजय माने २०११ साली प्रिया हॉटेल समोर झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याला १४ वर्षाची शिक्षा देखील लागली आहे. तो सध्या पॅरोल रजेवर बाहेर आला होता. गेल्या महिन्यात एका अल्पवयीन मुलीस तू मला आवडतेस असे म्हणून त्याने तिचा विनयभंग केला होता. त्याबाबत पीडीत मुलीने कुठेही वाच्यता केली नाही. काल २३ ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास त्याने पीडीत मुलीला बोलावून तिला जबरदस्तीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले तसेच याबाबत कुठे वाच्यता करू नये म्हणून धमकी दिली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडीत मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर तीन पथकाच्या माध्यमातून अवघ्या दीड तासात आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon