शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यास धमकावत खंडणी ची मागणी, तडीपार गुंडावर गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
अकोला – अकोला जिल्ह्यातून एका वर्षांसाठी तडीपार असलेल्या आरोपीने अनधिकृतपणे जिल्ह्यात प्रवेश करत खंडणी मागितल्याची घटना घडली आहे. आरोपी शिवा दत्तात्रय निलखन वय ३० वर्ष. रा शिर्ला अंधारे हा पातूर येथील रहिवासी असलेल्या शिवसेना उपजिल्हा प्रमुख सागर रामेकर यांच्या घरी जाऊन त्यांना आवाज देऊन उठविले असता सागर रामेकर यांनी त्यास काय काम आहे कशाला आला आहेस असे विचारले असता आरोपी शिवा निलखन याने त्याच्या कमरेला लागलेला चाकु दाखवत मला दोन दिवसात ५० हजार रूपे दे अन्यथा तुला जीवे मारून टाकीन असे म्हणत खंडणी मागितली.
दरम्यान १६ ऑगस्ट, २०२४ रोजी सागर रामेकर यांनी पातूर पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दिली असता सदर प्रकरणाची गंभीरता पाहता अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दखल घेत पातूर पोलिसांना तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले असून आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अनव्ये कलम ३०८ (४) नुसार खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिवा हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शिवा निलखन याच्यावर या अगोदर देखील अनेक गुन्हे दाखल असून एका प्रकरणात तो एका वर्षासाठी अकोला जिल्ह्यातून तडीपार केलेला असून देखील कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करीत त्याने अनाधिकृतपणे जिल्ह्यातील प्रवेश करीत शिवसेना (उ.बा.ठा.) उपजिल्हा प्रमुख सागर रामेकर यांना खंडणी मागून पातूर शहरातील गुन्हेगारीत आपले वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला. पातूर शहरात गल्लोगल्ली दादा, भाईचा ऊत आला असून हे गावगुंड आठ-दहा भंटोलांना सोबत घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करीत असताना दिसतात अशा “टपऱ्या दादांचा” कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊल उचलून यांची वरात काढून समाजातून त्यांची दहशत कमी करणाची गरज आहे.
बॉक्स काल घडलेल्या खंडणीच्या गुन्ह्याची आम्ही दखल घेतली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पातूर पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. मी वैयक्तिक रित्या आरोपीच्या शोधमोहिमेवर लक्ष ठेऊन आहे, शक्य तेवढ्या लवकर आरोपीस अटक करून पुढील कारवाई करण्यात येईल. – हनुमंत डोपेवाड ठाणेदार पातूर पोलीस स्टेशन