धक्कादायक ! अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार, पिंपरीतील घटना
पोलीस महानगर नेटवर्क
पिंपरी – पुण्यानंतर पिंपरी-चिंचवड मध्ये देखील गुन्ह्यांची मालिका सुरूच आहे.दिवसेंदिवस गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना पिंपरी परिसरात घडली आहे. एका अल्पवयीन मतीमंद मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर घटना २६ जुलै, २०२४ रोजी सकाळी दहाच्या सुमारास शाळेच्या स्वच्छतागृहाच्या बाहेरील पॅसेजमध्ये घडला आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी शाळेच्या शिपायावर पोक्सोसह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ३८ वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन शाळेचा नराधम शिपाई नारायण कुमाजी ठुबल (वय-५०, रा. गणेशनगर, मुळ रा. बोपखेल ता. हवेली) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (डी), (के)(एम), ६७, ७५ सह मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो), अपंग व्यक्तीचा हक्क कायदा कलम ७२ (ब) (ड), नागरी हक्क संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी मतीमंद असून निगडी परिसरातील एका शाळेत शिकते. मुलगी मतीमंद आणि अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील आरोपीने तिला अश्लील व्हिडीओ दाखवले. तिला मारण्याची धमकी देऊन अत्याचार केले. हा प्रकार आरोपीने गेल्या अनेक महिन्यांपासून वेळोवेळी केला आहे. १६ जुलै रोजी पीडित मुलगी शाळेच्या बाथरुमजवळ असलेल्या पॅसेजमध्ये असताना आरोपीने तिला अश्लील व्हिडीओ दाखवला तसेच तिला मारण्याची धमकी देऊन तिला जवळ ओढून गैरवर्तन करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच स्वच्छतागृहात नेऊन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. फिर्य़ादी यांच्या तक्रारीवरुन आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अद्याप अटक केलेली नाही. पुढील तपास निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी करीत आहेत.