कोन गावात हुक्का पार्लरवर छापा; कोनगाव पोलीसांकडून मालकासह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी – भिवंडी तालुक्यातील कोन गावात हुक्का पार्लर चालविणाऱ्या एका चालकासह त्याचे तीन कर्मचारी आणि पाच ग्राहकांविरुध्द कोन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोन गाव हद्दीतील रुप टाॅप लाॅन्ज हाॅटेल, तिसरा माळा टोयाटो शोरुमच्या वर, कोनगाव, ता.भिवंडी येथे आरोपी धीरेन महेश साधवानी हा आपल्या तीन कर्मचाऱ्यांंसह हुक्का पार्लर चालवित असल्याची माहिती कोन पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या हुक्का पार्लरवर छापा टाकला. तेथे त्यांना तंबाखूजन्य हुक्का चालक वाधवानी ग्राहकांना पुरवित असल्याचे आढळले. तसेच तेथील कर्मचारी हातात एका झाऱ्यामध्ये विस्तव घेऊन तो झारा ग्राहकांच्या समोर नेऊन त्यांंना हुुक्का सेवन करण्यासाठी साहाय्य करत होते. यावेळी झाऱ्यातील ठिणग्या दुकानात उडून दुकातील फर्निचरला आग लागून मानवी जीवित धोक्यात येण्याची शक्यता होती. त्यामळे कोन पोलीस ठाण्याचे हवालदार गणेश सोनावणे यांनी हुक्का पार्लर मालक धीरेन साधवानी, नोकर सुमीत राजपूत, नसीम अली, वियनकुमार प्रजापती, गौरव रेडिज, अविनाश ठमके, संदीप काकळे, अमीत गुरव, रवी डागत यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.