नवी मुंबईत पोलीस उपनिरीक्षकाने महिला कॉन्स्टेबलवर २ वर्ष केला बलात्कार, गुन्हा दाखल

Spread the love

नवी मुंबईत पोलीस उपनिरीक्षकाने महिला कॉन्स्टेबलवर २ वर्ष केला बलात्कार, गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

नवी मुंबई – नवी मुंबई येथील एका विवाहित महिला कॉन्स्टेबलने आपल्यावर बलात्कार करून छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर ३२ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचाराची सदर घटना सानपाडा भागात २०२० ते जुलै २०२२ दरम्यान घडल्याचे सांगितले अधिकाऱ्याने सांगितले तसेच त्या महिला कर्मचारीकडून १९ लाख रुपये उकळले. त्यानंतर तिला तिच्या पतीला सोडून देण्याचे सांगितले. पतीला सोडून न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देत होता. फसवणूक करुन घेतलेल्या पैशापैकी १४ लाख ६१ हजार परत केले. कायद्याचे रक्षकाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर खळबळजनक आरोप झाला आहे. हा आरोप त्याच्या विभागातील महिला कॉन्सटेबलने लावला आहे. त्या पोलीस अधिकाऱ्याने महिलेकडून १९ लाख रुपये उकळले आहेत. महिला कॉन्सटेबलच्या फिर्यादीनंतर मुंबईतील पंत नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतील पंतनगर पोलीस ठाण्यातील हा प्रकार आहे. या पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका ३२ वर्षीय महिला कॉन्सटेबलसोबत हा प्रकार घडला आहे. एका सहायक पोलीस निरीक्षकाने त्या विवाहित महिला कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवले. तिला नवी मुंबईतील सानपाडा भागात एका फ्लॅटवर नेऊन तब्बल २ वेळा अत्याचार केला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान ३७६ (बलात्कार), ३७६ (२) (एन), ३५४ (ए), ३५४ (डी), ५०६ (२) आणि ४२० या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पंतनगर पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने दाखल केला. त्यानंतर तो गुन्हा सानपाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी सानपाडा पोलीस करत आहे. मात्र, या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ एकच उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon