अमरावतीमध्ये न्यायालयाच्या वरिष्ठ लिपिकाला २०० रुपयाची लाच घेतांना रंगेहात अटक
पोलीस महानगर नेटवर्क
अमरावती – अमरावती जिल्ह्याच्या क्र. ३ च्या न्यायालयातील वरिष्ठ लिपिकाला २०० रुपयाची लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले. आरोपी हे न्यायालयात वरीष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहेत. संजय रामकृष्ण वाकडे , वय- ५१ वर्षे, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
यातील ३५ वर्षीय तक्रादार यांचे पक्षकार यांचा वारसा हक्क प्रमाणपत्र बाबतचे कागदपत्र नक्कल विभागात पाठवण्याकरिता नमूद आरोपीने तक्रारदार यांच्याकडे २०० रुपयाची लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. यावेळी सापळा रचून कारवाई केली असता आरोपीने लाचेची रक्कम स्वतः पंचा समक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.
सदर कारवाई मारुती जगताप, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अनिल पवार, अप्पर पोलीस अधीक्षक अपर पोलिस अधीक्षक, मिलिंद बहाकर, पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी, मंगेश मोहोड, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अंमलदार, युवराज राठोड, शैलेश कडू,नितेश राठोड, उपेंद्र थोरात यांच्या पथकाने केली.