दहशतवाद विरोधी पथकाची पिंपरी चिंचवडमध्ये मोठी कारवाई, ५ बांगलादेशींना अटक

Spread the love

दहशतवाद विरोधी पथकाची पिंपरी चिंचवडमध्ये मोठी कारवाई, ५ बांगलादेशींना अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – पिंपरी चिंचवड दहशतवादी विरोधी पथकाने बनावट कागद पत्रांसह ५ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. दहशतवादी विरोधी पथकाने बनावट कागदपत्रांसह भारतात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या ५ जणांना अटक केली आहे. ही कारवाई भोसरी भागातील शांतीनगर परिसरात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शमीम नुरोल राणा, राज उर्फ सम्राट सदन अधिकारी, जलील नरू शेख उर्फ जलील नूर मोहम्मद गोलदार ,वसीम अजीज उलहक मंडल उर्फ वसीम अजीऊल हक हिरा, आझाद शमशुल शेख उर्फ अबुल कलाम शमशुद्दिन फकीर या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे बांगलादेशी नागरिक असून त्यांच्याकडे कोणताही परवाना किंवा वैध कागदपत्र नाही. तरीही ते पिंपरी चिंचवड येथे राहत होते. ते बेकायदेशीररित्या भारतात बनावट आधार कार्ड, जन्माचा दाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट बनवून राहत होते. दशहतवाद विरोधी पथकाला याची माहिती मिळताच त्यांनी छापा टाकून पाचही नागरिकांना अटक केली आहे.

आरोपींकडून पोलिसांनी सिम कार्ड, अकरा हजार रुपये किमतीचा मोबाईल, एअरटेल कंपनीचे सिम आदी साहित्य जप्त केले आहे. त्यांच्यावर परकीय नागरिक कायदा पारपत्र अधिनियम आणि भारतात प्रवेश करण्याचा नियम यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. बांगलादेशचे हे नागरीक नेमकं कोणत्या हेतूने पिंपरी चिंचवडमध्ये राहत होते, त्यांचा कुठलाही वाईट हेतू तर नव्हता ना? या दृष्टीनेदेखील तपास केला जाणार आहे. दरम्यान, पुण्यात मोठा घातपात घडवण्याचा कट आखणाऱ्या दहशतावाद्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं होतं. पुणे पोलिसांनी गेल्यावर्षी दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. पुणे पोलिसांनी एका मोटारसायकल चोरी प्रकरणाचा शोध घेत होते. त्यावेळी इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी या दोघांची चौकशी केली असता ते घाबरले. यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांच्या घराची तपासणी केली असता आक्षेपार्ह साहित्य मिळाले होते. त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांच्या चौकशीत ते एनआयएच्या यादीत असणारे मोस्ट वॉटेंड दहशतवादी असल्याचे स्पष्ट झालं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon