नेरुळ पोलिसांची कारवाई; वाहन चोरांच्या दोन टोळ्या अटकेत, १६ वाहने जप्त

Spread the love

नेरुळ पोलिसांची कारवाई; वाहन चोरांच्या दोन टोळ्या अटकेत, १६ वाहने जप्त

पोलीस महानगर नेटवर्क

नवी मुंबई : शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी नेरुळ पोलिसांनी मोठी कारवाई करत वाहन चोरांच्या दोन वेगवेगळ्या टोळ्यांचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी ११ मोटारसायकली आणि ५ रिक्षा असा एकूण सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नेरुळ परिसरात विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते. या मोहिमेचा उद्देश वाहन चोरी, अमली पदार्थ तस्करी तसेच बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात कारवाई करणे हा होता.

या दरम्यान संशयित हालचालींच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत दोन वाहन चोरीच्या टोळ्यांना अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेल्या १६ वाहनांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून त्यामध्ये ११ मोटारसायकली आणि ५ रिक्षांचा समावेश आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरीची वाहने जप्त करण्यात आली असून या कारवाईमुळे वाहन चोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल झाली आहे. पुढील तपास नेरुळ पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon