धक्कादायक ! पुण्यात पुन्हा एकदा तरुणीवर कोयत्याने हल्ला
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही तरुणांकडून तरुणीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न झाला आहे. पण तरुणीने आरडाओरड केल्याने आरोपींनी तेथून पळ काढला आहे. त्यामुळे तरुणी बचावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सुभाषनगर येथील गल्ली क्रमांक ६ मध्ये ही घटना घडली आहे. प्रेमसंबंध संपवल्याच्या रागातून ११वीत शिकणाऱ्या तरुणीवर आरोपीने कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपी आणि पीडित मुलगी हे दोघे ही काही दिवसांपासून प्रेमसंबंधात होते. त्यानंतर युवती काही काराणावरून आरोपीशी बोलत नव्हती. हाच राग मनात धरत आरोपीने तरुणीवर हल्ला करण्याच ठरवले. घटनास्थळावरू नागरिकांनी आरडा ओरड केल्यामुळे दुचाकीवरून आलेले हल्लेखोर पळून गेले. महिलांना आरडाओरड केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि पीडितेचे प्राण वाचले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. तरुणी हल्लेखोरासोबत बोलत नव्हती त्यामुळे रागाच्या भरात त्यांनी तीच्यावर हल्ला करायचा ठरवला. पण शेजारच्यांनी आरडाओरड केल्याने आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
यानंतर त्या ठिकाणच्या नागरिकांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली. तत्काळ येथे पोलीस दाखल झाले. पण, तोपर्यंत दोघे दुचाकीस्वार येथून पळून गेले होते. नागरिकांनी त्यांचे फोटो व दुचाकी याचे फोटो पोलिसांना दिले. यानंतर पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे