गोळीबाराच्या घटनेनं नाशिक हादरलं; अनैतिक संबंधातून माजी सैनिकाची हत्या, परिसरात खळबळ
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – नाशिक शहरात खुनाचे तांडव सुरू असून नाशिक रोड ला भाच्याने केला मामी चा खून तर पंचवटीत भिकारी याच्या हत्येनंतर रविवारी रात्री माजी सैनिकाच्या पत्नीच्या अनैतिक संबंधावरून माजी सैनिकालाच गोळी घालून मारल्याची घटना घडली.
अमोल पोपटराव काठे(रा. एकलहरा रोड) असे मृत माजी सैनिकाचे नाव आहे. डोक्यात व छातीवर गोळी लागल्याने तो जागीच ठार झाला तर एक जण जखमी झाल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त सचिन बारी, युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड घटनास्थळी दाखल झाले.
चेतन घडे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. या गोळीबारात अमोल काठे यांचा भाऊ कुंदन गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अमोल काठे हा माजी सैनिक असून त्याचे चेतनच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते.त्यामुळे चेतनने माजी सैनिकाचा खून केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत