अमरावतीमध्ये महापुरुषांच्या कमानीवरुन वाद, आंदोलकांची तुफान दगडफेक ; पोलिसांचा लाठीचार्ज
पोलीस महानगर नेटवर्क
अमरावती – अमरावतीच्या पांढरी खानापूर गावाच्या प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं, यासाठी चार दिवसांपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. गावातील संचारबंदी झुगारून आंदोलक अमरावतीत दाखल झाले. अमरावतीच्या खानापूर पांढरीमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये तुफान राडा झाला आहे. प्रवेश द्वाराच्या मुद्द्यावरून जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. तर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला आहे.
अमरावतीच्या पांढरी खानापूर गावाच्या प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं, यासाठी चार दिवसांपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. गावातील संचारबंदी झुगारून आंदोलक अमरावतीत दाखल झाले. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं प्रवेशद्वार लावण्यावरून दोन गट आमने-सामने आले. यानंतर गावात संचारबंदी लावण्यात आली, पण तरीही आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालयावर आले. याठिकाणी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, त्यामुळे परिसराला छावणीचं स्वरुप आलं आहे. आंदोलकांनी विभागीय आयुक्त कार्यालयाला घेरा घातला.
दगडफेकीच्या या घटनेनंतर मोठा पोलिस ताफा शहरात तैनात करण्यात आला आहे. दगडफेक करणाऱ्यांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे. दगडफेकीत सुरुवातीला एक पोलिस जखमी झाल्याची माहिती पुढे आली. मात्र, दगडफेकीची तीव्रता पाहता जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अमरावती शहरात घडलेल्या या प्रकारानंतर राजकीय क्षेत्रातील मंडळींनी घटनास्थळाकडे धाव घेतली. बडनेराचे आमदार रवी राणा यांनी हा प्रकार जातीय तेढ निर्माण करणारा असल्याचे सांगितले. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार लावण्यावरून दोन गट आमने-सामने आले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून खानापूर गावच्या प्रवेशद्वाराचा वाद सुरू आहे. यावरून स्थानिकांनी आंदोलनही केले होते. यानंतर पोलिसांनी संचारबंदी लागू केली होती. मात्र, संचारबंदी झुगारून मोठ्या संख्येने आंदोलक अमरावतीत पोहोचले. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.