बहिनीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय, घरात घुसून कोयत्याने तोडफोड
पिंपरी – बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन दोन जणांनी तरुणाच्या घरात घुसून वडिलांना मारहाण केली. तसेच हातातील कोयत्याने घरातील सामानाची तोडफोड करुन मुलाला संपवण्याची धमकी दिली. ही घटना प्राधिकरण निगडी येथील रस्टन कॉलनीत घडली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती घरी अशताना आरोपी हातात कोयते घावून घरात आले व त्यांनी फिर्यादीच्या मुलाच्या नावाने आरडोओरड करत माझ्या बहिणी सोबत बोलणे बंद कर म्हणत घरातील सामानाची तोडफोड केली. तसेच फिर्यादीच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.