रस्त्याच्या कडेला असलेल्या वाहनांमधून सामान चोरी करण्याऱ्या चौकडीला पोलिसांनी केले जेरबंद
टेंभुर्णी – पुणे,सोलापूर महामार्ग,इंदापूर टोलनाका, वरवडे टोलनाका,सावळेश्वर टोलनाका,हॉटेल,ढाबा याठिकाणी थांबलेली वाहने यामधून विविध प्रकारचा माल चोरणाऱ्या चौकडीला पोलिसांना जेरबंद करण्यात यश आले आहे. आयशर टेम्पो क. एपी ०९ एक्स २२८३ यामधुन मागील दोन वर्षामध्ये धावत्या वाहनातुन,
रोडच्या बाजुस थांबलेल्या वाहनातुन,हॉटेल व ढाब्यावर मुक्कामी थांबलेले वाहनातुन (मालट्रक, टेम्पो, कंटेनर इत्यादी) विविध प्रकारचा माल चोरल्या बाबत आरोपींनी कबुली दिली आहे. सदर क्रमांकाच्या आयशर ट्रकची मागील दोन वर्षामध्ये इंदापूर टोलनाका, वरवडे टोलनाका, सावळेश्वर टोलनाका या ठिकाणी भरपुर वेळा येण्याजाण्याचे रेकार्ड मिळालेले आहेत. तसेच मोहोळ, इंदापूर, टेंभुर्णी,सोलापूर इथे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.या ट्रकचा वापर करून पुणे ते सोलापूर हायवे रोडवर मालट्रकांमधून कपडयाचे गटटे, तागे, चप्पल बुटांचे बॉक्स, मोबाईलचे साहित्याचे बॉक्स, इलेक्ट्रॉनिक वस्तूचे बॉक्स, साबण बॉक्स इत्यादी माल चोरी केल्याची कबुली सुद्धा दिलेली आहे.
टेंभुर्णी पोलीस ठाण्यात या चौकडीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा रजि. नं.- ७३/२०२४ भा.द.वि. क. ३७९, ४११, ४१४, ३४ असून श्रवणलाल विष्णुराम जाट वय-३२ वर्षे रा. बिलाडा गांव ता. दियावर जिल्हा पाली राजस्थान, बुधाराम दुर्गाराम खुमोद वय-३९ वर्षे रा. पटवा ता. जैतरंग जि. पाली राजस्थान, सुरेश बाबुलाल चौधरी वय- २८ वर्षे रा. देवरिया ता. जैतरंग जि. पाली राजस्थान व राजुराम खुशालराम जाट वय-२९ वर्षे रा. गेमलिया ता. देगाना जि.नागोर, राजस्थान यांना अटक करून न्यायालयात हजर केलं असता पोलीस कस्टडी देण्यात आली असल्याचे पोलीस उपनिरीक्षक के.व्ही. सोनटक्के यांनी सांगितले.