शरद पवार पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत ; शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार ?
पुणे -शरद पवार पुन्हा एकदा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. नवा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्याच्या राजकारणात दररोज मोठ्या घडामोडी होत आहे. पुण्यात शरद पवार गटाची महत्वाची बैठक सुरू असून शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची बैठक आज पुण्यात चालू आहे. पक्षाचे सर्व आमदार, खासदार या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत शरद पवार हे सर्व नेते, आमदार व खासदारांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे