गायिका अन् अभिनेत्री मल्लिका राजपूतनं संपवलं आयुष्य? राहत्या घरात संशयास्पद मृत्यू
सुल्ताणपूर – गायिका आणि अभिनेत्री विजयालक्ष्मी उर्फ मल्लिका राजपूत हीने टोकाचे पाऊल उचलले आहे. मल्लिकाने सुल्तानपूर येथील राहत्या घरात आत्महत्या केली आहे. या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मल्लिकाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मल्लिका राजपूतने आत्महत्येचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समोर आले नाही. मल्लिकाने कंगनासोबत काम केले आहे.
मल्लिका राजपूतने राजकारणातही हात आजमावला होता. तिने भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र, २०१८ मध्ये तिने पक्ष सोडला. मनोरंजन विश्वात आणि नंतर राजकारणात तिचं करिअर यशस्वी होऊ शकलं नाही, त्यानंतर मल्लिका अध्यात्माकडे वळली होती.